वाढदिवस शुभेच्छा पत्र विशाल मेहेर
🎂🍫🍻वाढदिवस शुभेच्छा पत्र🍻💐
🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻
आजचे उत्सवमूर्ती , टेम्भी चे सुपुत्र व गणपती मंदिर परिसराचे डॉन,विद्यामंदिर विरार हायस्कूल ह्या जगप्रसिद्ध विश्वविद्यालयाचे अत्यंत हुशार व गुणवंत विद्यार्थी, वर्तक कॉलेज ह्या जगप्रसिद्ध महाविद्यालयातील किर्तीवान विध्यार्थी,
94 च्या दहावी बॅच मधील अ पासून ह ग पर्यंत वयाने सर्वात लहान, फेसबुकवर 10 वर्षे लहान दिसणारे,
फ्रेंच कट ठेऊन डेंजर डॉन व सफाचट करून राजकुमार सारखे कॉलेजकुमार दिसणारे, सुपरबॉय दक्ष चे पप्पा,
गावाला जाऊन मोठ्या तंगडी वाले खेकडे पकडणारे,
व्हॉटसअँप च्या जन्मापासून एकच बॉण्ड वाला डी पी ठेवणारे,
ग्रुप मधले नंबर दोन चे कळ लावे (एक नंबर अजून अरूण कडेच आहे),
अरुण + रवींद्र + प्रशांत ज्यांच्या समोर बोलण्यात कमी पडतात असे शूरवीर, (पण चंपक भाऊ समोर ब्र न काढणारे)
गूगल सर्च न करता कोणतीही माहिती लगेचच देणारे, कितीही राग आला तरी तो व्यक्त न करता परिस्थिती शांतपणे हाताळणारे,
इंग्रजी ह्या पाश्चात्य भाषेचे सखोल ज्ञान प्राप्ती असूनही सतत मायबोली मराठीतूनच वार्तालाप करणासाठी आग्रही असलेले,
पार्टी साठी कधीही कुठेही कसेही नेहमी सज्ज असणारे,
पार्टीतली जान, पार्टीत टॉप टू बॉटम मारणारे, बॉक्स च्या बॉक्स खाली करणारे,
रवींद्र चे सुपर परममित्र,
मी दहावी नंतर विरार सोडले त्यानंतर संपर्कात राहणारा माझा एकमेव शाळकरी मित्र, ज्याच्यामुळे मला ह्या ग्रुप मध्ये अरुणची इच्छा नसताना इतरांना उंगली करण्याची संधी मिळाली, ज्याला सहावीत असताना वाढदिवसाला एक साधं पेन दिले तरी आनंदाने स्वीकारून घरी जंगी पार्टी देणारा, अश्या मित्रांसाठी माझ्याकडून हे छोटेसे शुभेच्छा पत्र,
श्रीयुत विशाल प्रभाकर मेहेर यांना वाढदिवसाच्या गोदरेज, व्हिडिओकॉन एलजी च्या 1000 लिटर चे सर्व फ्रिज भरून हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक
जतिन पाटील, पालघर व समस्त मुलांचा कट्टा 1994 मित्र परिवार
🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻
Comments
Post a Comment