Posts

Showing posts from June, 2019

Happy birthday marathi wishes nitin sawant

Image
 वाढदिवस शुभेच्छा पत्र ग्रुप मधील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व, स्पेशल मेसेजेस साठी विश्वाविख्यात, पार्टी साठी नेहमी सज्ज असणारे, साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या  तोंड उघडल्यावर फुलं बसरणाऱ्या  पण मनाने साफ असणाऱ्या  किती मस्करी केली तरी राग न येता वाघालाच ..., लहानपणापासून आतापर्यंत कधीच कुणाशी भांडण नसलेले, फक्त लोकल मध्ये कोणी शहाणपणा केल्यास त्याला दोन सीट मध्ये आडवे टाकून आपल्या 50किलो नाजूक पायाने तुडवणारे, भारी भक्कम व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी प्रमाणे मोठ्या मनाचे, आपले सर्वांचे प्रिय मित्र नितीन सावंत यांना वरून भोळा भानगडी सोळा संघटने कडून वाढदिवसाच्या बोरिवली ते कांदिवली च्या सर्व लोकल ट्रेन भरून, 2 वेळा चेन पूलिंग करून हार्दिक शुभेच्छा

Marathi happy birthday wishes sanjeev gharat

🎂🍰  वाढदिवस शुभेच्छा पत्र 🎻🎼📽️ ऍनिमेशन च्या दुनियेतील बाप माणूस, ऍडसेज चे मालक, सर्वेसर्वा, व 88 पिक्चर मधील ऍनिमेटर, रहेजा मधून पदवी संपादन केलेले, व लाल बहादूर शाळेतील शांत व शिस्तप्रिय विद्यार्थी, माउथ ऑर्गन वाजवण्यात पारंगत, शेफालीग्रज, प्रेमळ आई बाबांचे लाडके, त्यांच्या श्याम रंगाच्या विरुद्ध त्यांचे मन नितळ व साफ, स्वतः पिणार नाही दुसऱ्याला ही पाजनार नाही या तत्वावर चालणारे आमचे सर्वात लाडके मित्र संजू उर्फ संज्या, उर्फ कालिया उर्फ संजीव घरत यांना 1000 मारुती झेन भरून शुभेच्छा